(Originally written in Konkani by Kiran Mhambre)
ह्या सगळ्याराज्याचासम्राट होऊन आता वर्षे उलटली होती. तिथे सगळ्याना त्याच्या राजेपणाची सवय झाली होती. सर्वाकडून योग्य तो मान सन्मान मिळवत होता. उचीत जरब सगळ्यावर होती.
आता हे नेहमीचेच झाले होते. जाल तिथे सगळी कडे त्याचे वर्चस्व सर्वांनी मान्य केले होते. विरोध संपला होता. आणि त्याच बरोबर मात करून विजय मिळवण्याची सवंय संपली होती.
कंटाळा- आता आयुष्य म्हणजे कंटाळा होऊ लागले होते. मात नाही तर विजयाचा कैफ येणार कुठून! त्या कैफातच जीवनाला अर्थ असतो.
त्याने आपला प्रांत, आपले राज्य सोडले. आता नवे आव्हान हवे होते आयुष्याला. तो आव्हानाच्या शोधात बाहेर पडला. बघू तरी दुसरी कडे काय आहे ते. आपल्या दिमाखदार ऐटीने तो पुढे चालला होता.
वाटेत भेटणारे दुर्बळ , कमजोर. कोण झाडामागे लपत होता, तर कोण दगडा खाली. भीतीने जीव मुठीत घेऊन सगळे दुरूनच त्याला न्याहाळत होते. आजूबाजूला तो असणे म्हणजेच केवढा हाहाःकार याची जाणीव सर्वांनाच होती. सगळे स्तब्ध. त्याला गर्वच चढला.
कुणीतरी आपल्या शक्तीचा अंदाज नसलेला उसळून पुढे आला. ह्याने त्याला क्षणार्धात संपवलं. झटापटही करावी लागली नाही.
बेसावध असलेला असाच दुसरा कुणी आपला प्राण गमावून बसला. शेवटी गाठ सम्राटाशी होती.
तो चालत राहिला. चालत राहिला. सम्राटच तो सम्राटाच्या थाटात पुढे चालत राहिला.
जाताना मध्येच तो थबकला.
पुढे कुणी तरी असल्याची चाहूल लागली. उफ्! ह्याचे राज्य असावे येथे. येऊ दे पुढे. मी आलोच कशाला इथे! कुणा कडे तरी झुंजण्याची मनाची खुमखुमी मनात होतीच. विजयाची ओढ लागली होती.
जीवनात फक्त खाणे-पिणेच महत्वाचे नसते. प्रजोत्पत्ती करूनही तृप्ती मिळत नसते. विजयाची धुंदी हवीच असते. जीवनाचे अमृत तेच.
त्याने अंदाज घेतला. तो आणि ती दोघंही ह्या प्रातांत अधिपत्य गाजवत असावीत. नाहीतर एवढी निर्धास्त राहिली नसती. दोघंही निःसंकोच हिंडत होती.
पण तो दुसरा सावध झाला. त्याने आपल्या जोडीदारिणीला सावध केले. आपल्या प्रांतात कुणीतरी परका शिरला आहे, आपल्या अधिपत्याला आव्हान देणारा. त्याने आपल्या जोडीदारिणीला दूर जायला सांगितले.
सावध होऊन अंदाज घेताना त्याला ह्या अनाहुताची चाहूल लागली.
अस्सं! माझ्या परिसरात आला आहेस तर. मी इथे असतांना दुसरा कसा येऊ शकतो ते बघतोच. तोही दोन हात करायला तयार झाला.
अनाहूत सम्राट पुढे झाला. दोघानीही एकमेकांचा अंदाज घतेला आणि एकमेकावर तुटून पडले.
दोघेही तुल्यबळ होते. एकमेकांना हरवण्याची जिद्द बाळगणारे.
अटीतटीचे युद्ध झाले. दुसऱ्याची जोडीदारीण दुरूनच बघत होती.
शेवटी पहिल्याने दुसऱ्यावर असा वार केला की दुसऱ्याचे अवसान संपले. माघार घेतलेल्याला त्या परिसराचा राजा म्हणवून घेण्याचा अधिकार नसतो. त्यानं ती जागा सोडून जाणे हा नियम. तो मागे वळला. आपल्या सहकारिणी कडे पाहाण्याचे ध्यैर्य त्याला झाले नाही. तो तिच्या कडे न बघताच निघाला.
त्याची जोडीदारीण दुरून बघत होती.
आपला साथीदार हरलेला तिने पाहिला. आता त्याने तो परिसर सोडणे क्रमप्राप्त होते. सुन्न होऊन ती बघत राहिली. त्यांच्या सुखाचा अंत झाला होता. संगतीने घालविलेल्या आनंदाचे दिवस संपले होते. एकमेकांच्या सहवासाचे सूख संपले होते.
दुःखाने तिचे अंतःकरण पिळवटले.
कंठाशी प्राण आणून ती आपल्या शत्रूकडे बघत होती. तो तिच्याच बाजूने येत होता.
नराला हरवल्यावर त्याची पत्नी आपल्या हक्काची मालमत्ता. तिच्यावर अधिकार गाजवायला तो तिच्या जवळ यायला लागला. विजयाच्या उन्मादाने वाढलेल्या आत्मविश्वासाने तो जास्तच ऐटीत चालत होता.
तो तिच्या जवळ आला.
त्याच्या मनात काय आहे हे तिने ओळखले..
‘ह्याला कुणी अधिकार दिला माझ्यावर हक्क सांगण्याचा? माझा जोडीदार हरला म्हणजे मी हरले असं होत नाही. माझ्या मर्जी शिवाय माझ्या जवळ येण्याचे धाडस हा करूच कसा शकतो? माझ्या साथीदाराला हरवणारा माझ्या पेक्षा बळिष्ट असेलहि. पण म्हणून मी शरणांगती पत्करेन हे कुणी सांगितलं याला? मी झुंजू शकत नाही असं का वाटते याला? माझे मन माझ्याच आधीन आहे . बळ दाखवून जिंकू शकशील एवढं तकलादू नाही मन माझे. माझ्या मनाची संमती असल्या शिवाय कुणीच माझ्या जवळ येऊ शकणार नाही..’
तिने स्वतःला झुंजण्यसाठी तयार ठेवले. तो ऐटीत जिंकल्याच्या गुर्मीत तिच्या जवळ येत होता. तिने त्याला अडवले.
तो उद्धट. त्याने उद्दाम पणे तिच्यावर हल्ला केला.
तिने धिटाईने त्याचा प्रतिकार केला.
तिने प्रतिकार सोडलाच नाही.
‘नाही, पळून नाही जाणार. मेले तरी बेहत्तर. मरणारच. पण मरण्या आधी याला मारीन.’तिने निश्चय केला. त्याच्या हल्ल्याला तितक्याच नेटानं तोंड देत राहिली.
शेवटी शक्ती कमी पडलीच. त्याने नेमका मानेचाच चावा घेतला. तिने सगली शक्ती एकवटून त्याला गरागरा फिरवले. तोंडातून रक्त वाहू लागले तरी तिने हार मानली नाही.
शक्ती हळूहळू मंदावली आणि तिचे प्राण शरीर सोडून गेले.
तिचा प्रतिकार संपला. अचेतन शरीर शांत झाले.
ती गेली याची खात्री पटल्यावर त्याने मानेवरील चावा सैल केला. तो पुन्हा जिंकला होता.
"नागराज म्हणतात मला! नागराज! किंग कोब्रा!"
आज तो नागराजांचा राजा झाला होता. त्याने मेलेल्या नागिणिला गिळण्याचा प्रयत्न केला. पण ती गर्भार आशल्याने तिच्या फुगलेल्या पोटाने तिला गिळणे शक्य झाले नाही. तिला तशीच सोडून तो पुढे निघाला.
शेवटी जीवन हे असंच.
एकाच जागी थांबून नेहमी तेच तेच करण्यात काय अर्थ आहे?
आधी त्याच्या कडे आनी नंतर तिच्या कडे लढतांना किती तरी वेळा त्याला मरणाची चाहूल लागली होती. पण त्याच्या कडे झुंजल्या नंतर त्याला तिच्या कडे झुंजताना चेव चढला होता. तिचा प्रतिकार मात्र कमी नव्हताच. शरीरातील बळा पेक्षा ती मनातील बळ घेवून झुंजत होती. आपण हरतो, आपण हरतो असे कितीदां तरी वाटले होते. शेवटी शारिरीक बळच उपयोगी पडले होते. तिचे शरीर काही झाले तरी दुर्बळच होते.शिवाय गर्भार होती. मनातली जिद्द मात्र तिची दाद देण्या लायक होती. आपण जरा कमी पडलो असतो तर मृत्युलाच सामोरा गेलो असतो. तिच्या मनाचा निर्धार मात्र स्पष्ट जाणवत होता. असो. शेवटी हरलीच. मारून टाकावी लागली. पोटातील गर्भासहीत. विजय मिळवण्याच्या ध्येयाने पुढे सरसावलेला, विजय मिळालाच.
मनावर एकप्रकारची गंभीर छाया पसरली. जिंकण्याच्या आनंदा पेक्षा एकप्रकारचा राग, उद्वेग भरला होता मनात. कुणाचा राग, कसला राग, कशासाठी? रागच की आणखी काही? एखादवेळी तिनं प्रतिकार केला म्हणून आसेल. तो राग तो उद्वेग घेऊन तो पुढे जातच राहिला. इकडे तिकडे पाहाण्याचे भानच त्याला राहिले नाही.
अचानक समोर त्याला कुणी तरी दिसला. आणि त्याने डोके वर काढले.
आपल्या पायपाशी एवढा मोठ्ठा नाग बघून त्या बाईने किंकाळीच फोडली. ‘साप, साप.’ पोट तिडकीने आक्रोश करीत ती धावली. लोक लाठ्या काठ्या घेऊन आले.
आपण माणसांच्या गोटात पोचल्याची त्याला जाणीव झाली. इथे येऊन काहीच उपयोग नाही. हा आपण राहाण्याचा परिसर नाही.
कसल्या तंद्रीत इथं पोचलो कोण जाणे. आपण वाट चुकलो याची जाणीव झाली त्याला. तो परतला. पोचला होता त्या घरातून बाहेर पडण्याची वाट शोधू लागला.
भिंतीच्या कडेने, सामानाच्या अडगळीतून तो बाहेर पडण्याची वाट शोधायला लागला.
"अरे देवा! केवढाला!" काठी घेऊन आलेल्या एकाने म्हटले. तो जाईल तिथली अडगळ दूर करण्याचे काम चालले होते. तो घबरला. अख्ख्या आयुष्यात पहिल्यांदा घाबरला. मोकळ्या जागी येण्याचे धाडस त्याला झाले नाही. तो आणखीनच अडगळीत शिरू लागला.
"छे:! विषारी तो .चावला बिवला तर काहीच उपयोगाचे नाही." दुसरा म्हणाला. नागराज अधिकाधिक खाचाखळग्यात शिरून लपून राहाण्याचा प्रयत्न करू लागला. तिथे त्याचे बळ कामी येणार नव्हते.आजूबाजूच्या लोकांची बुद्धी जागी झाली होती. त्यांची युक्ती आपल्या शक्ती वर मात करेल हे त्याला समजून चुकले होते.
"थांबा थांबा." कुणीतरी ओरडला. मारू नका त्याला.
ओरडणारा माणूस हातात काठी आणि पोतं घेऊन आला. बरोबरच्या माणसाला त्यानं दिव्याचा प्रकाश टाकायला सांगितलं. आडोशाला लपलेल्या नागराजाला पळून जाण्यासाठी वाटच नव्हती. त्या माणसाने काठी घालून त्याला बाहेर ओढले. आणि अलगद पोत्यात सोडले. बराच वेळ पोत्यात राहिल्या नंतर एका मोकळ्या रानात त्याची सुटका झाली.
शेवटी तो मुक्त झाला. तरी तो त्याचा पराभवच होता. जिथे पोचला होता तिथे तो आपल्या मर्जीने आला नव्हता. त्याला इतरांनी आणून सोडलें होते.
मन अस्वस्थ झाले. तो दिसेल त्या बिळात शिरला.
बाहेरनं आणणारा इतरांना सागंत होता, "त्यानां मारू नका. आपल्याला उपयोगी पडतात ते."
‘यानां उपयोगी पडतो म्हणून जगायचें आपण? आपल्याला जगायचा हक्क आहे म्हणून नाही? हा झुंजण्याचा हव्यास. झुजण्यात जय असतो तसा मृत्युही असतो आणि पराभवही असतो.पराभव आपणहून मान्य केलेला असू शकतो. जसा नागराजाने स्वीकारला. पराभव नागिणी सारखा मरण स्वीकारून पत्करता येतो. आणि पराभव असे दयेचे दान मिळवून लादून मिळालेला, स्वतःला तुच्छ लेखायला लावणाराही असू शकतो. बिळातून नागाने सुस्कारा सोडला.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा